Designed bySUNIL JADHAV
expr:class='"loading" + data:blog.mobileClass'>

भोजनापूर्वीची प्रार्थना


            भोजनापूर्वीची प्रार्थना

वदनि कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करि जिवीत्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ।। १ ।।
जनी भोजनी नाम वाचे वदावे
अति आदरे गद्य घोषे म्हणावे
हरि चिंतने अन्न सेवीत जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ।। २ ।।
उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासि सदा नमावे
सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वांमुखी मंगल बोलवावे ।। ३ ।।
ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै
तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शांति: शांति: शांति: ।।